Sanjay Raut Speech Video : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केलं. त्यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. या बहिणीच्या भावानं सध्या रंग बदललाय. तो पिंक झालाय. सरडा रंग बदलतो असं ऐकलं होतं. पण तो अचानक पिंक होतो हे माहीत नव्हतं. पण पिंक रंग राजकारणात चालत नाही. इथं फक्त भगवा आणि तिरंगाच चालतो, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.