Varun Sardesai PPT Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षांना संशय असून वेगवेगळ्या माध्यमातून ते आपले मुद्दे मांडत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करत मतदानातील घोळ मांडण्याचा प्रयत्न केला. पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे उमेदवार पुढं होते. मात्र ईव्हीएम मतदानात सगळा ट्रेंड बदलला. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची मांडणी करत त्यांनी हे निदर्शनास आणून दिलं.