Sandhya Doshi Joins Eknath Shinde shivsena : मुंबईतील माजी नगरसेविका संध्या विपुल दोशी यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्या दोषी यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. २०२२ पासून मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. सध्या महापालिकेवर प्रशासक आहे. या वर्षाच्या शेवटी ही निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोषी यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला.