Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १७ नोव्हेंबर रोजी बीकेसी इथं महाविकास आघाडीची संयुक्त सभा झाली. या सभेला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. केंद्रातील नीती आयोगानं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मात्र, आम्ही तसं होऊ देणार नाही. मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर आम्ही त्यांना कापणार, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.