Uddhav Thackeray Slams RSS : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी इथं पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी खणखणीत भाषण करत भाजप, आरएसएशवर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या काळात आरएसएसचे ९० हजार कार्यकर्ते राज्याबाहेरून आले होते. आता ते कुठं आहेत? मुंबईकरांवर संकट येईल तेव्हा ते धावून येतील का? तेव्हा फक्त शिवसैनिक असेल. एखाद्याला रक्त हवं असेल तर आरएसएसचे लोक त्यांना गोमूत्र देतील, असा बोचरा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.