Uddhav Thackeray on Amit Shah : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी इथं पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी खणखणीत भाषण करत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. मराठी माणसाच्या नादी लागू नका. मराठी माणसानं औरंगजेबाला झुकवलंय, अमित शहा किस झाड की पत्ती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.