महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महायुतीला नेमक्या कोणत्या कारणानं लोकांनी ही मतं दिली हे कळत नाही. सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? उद्योग गुजरातला नेले जातायत म्हणून दिली का? महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलीय म्हणून दिली का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. वन नेशन वन पार्टीच्या दिशेनं आपला प्रवास सुरू आहे का अशी भीती वाटावा असा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.