Balasaheb Thackeray on his death anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी शिवसैनिकांची रीघ लागली आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केलं. रश्मी ठाकरे या देखील यावेळी उपस्थित होत्या. स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे यांना पाहून शिवसैनिक भावूक झाले. गद्दारांना धडा शिकवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं शिवसैनिक सांगत होते.