Uddhav thackeray on rebels : शिवसेनेच्या (उबाठा) वतीनं विलेपार्ले इथं आयोजित केलेल्या महानोकरी मेळाव्याच्या उद्घाटनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोकोपयोगी कामांचं कौतुक केलं. शिवसेनेचा जन्मच मुळी लोकांना रोजगार देण्यासाठी झाला. आजही ते काम सुरू आहे. शिवसेनेला संपवायला निघालेल्यांनी त्यांची अशी काम दाखवून द्यावी. आमच्या सरकारनं आणलेले प्रकल्पही ह्यांनी घालवले. आता काही दिवसानं हे बेरोजगार होणार आहेत. पण एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.