Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांना त्यांनी ढेकणाची उपमा दिली. मी ढेकणांना आव्हान देत नाही, त्यांना अंगठ्यानं चिरडायचं असतं, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.