Video : श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतच बोलून दाखवली हनुमान चालिसा, पाहा काय झालं?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतच बोलून दाखवली हनुमान चालिसा, पाहा काय झालं?

Video : श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतच बोलून दाखवली हनुमान चालिसा, पाहा काय झालं?

Updated Aug 09, 2023 10:01 AM IST

Shrikant Shinde on no confidence motion : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिलं पाहिजे अशी आग्रही मागणी करत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेत पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधी बाकांवरील अनेक सदस्यांनी भाग घेतला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालिसावरही बंदी होती असं ते म्हणाले. त्यावर तुम्हाला हनुमान चालिसा येते का अशी विचारणा विरोधी बाकांवरून करण्यात आली. ते आव्हान स्वीकारत श्रीकांत शिंदे यांनी खणखणीत आवाजात हनुमान चालिसा म्हणून दाखवली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp