BMC Officer slapped Video : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शिवसेनेची शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा चालवल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी सोमवारी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्यास पोलिसांसमोरच मारहाण केली. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड ऑफिसवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी हा प्रकार घडला. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी अनिल परब यांच्यासह १५ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.