Sharad Pawar Speech Video : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (baramati lok sabha) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज इंदापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या समोर कुणी लढूच नये अशी या सरकारची मानसिकता आहे. याच भूमिकेतून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. काँग्रेससारख्या जुन्या आणि मोठ्या पक्षाची बँक खाती गोठवली गेली आहेत. उद्या लोक सरकारविरुद्ध बोलायला लागले तर त्यांचीही खाती गोठवली जातील, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. अशा सरकारचा पराभव करण्यासाठी एकत्र या, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं.