Sharad Pawar on Amit Shah : ‘देशाच्या गृहमंत्र्यांनी माझ्याबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. त्यांना भाषणं करण्याचा अधिकार आहे. पण ते करताना थोडीफार माहिती घेऊन बोललं पाहिजे,’ असं सांगतानाच, ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी' या मराठी म्हणीची आठवण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलीकडंच अमित शहा यांनी शिर्डी येथील भाजपच्या मेळाव्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला पवारांनी उत्तर दिलं. शरद पवार यांनी यावेळी देशाच्या आणि गुजरातच्या गौरवशाली राजकीय नेतृत्वपरंपरेला उजाळा देत अमित शहा यांना टोले हाणले.