Sharad Pawar slams Narendra Modi : जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस पक्षावर व गांधी कुटुंबावर वैयक्तिक टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. 'जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी बोलताना पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांनी सामान्यांचीही प्रतिष्ठा जपली पाहिजे. मात्र, आपले पंतप्रधान विकासावर व धोरणात्मक बाबींवर बोलण्याचं सोडून विरोधी पक्षांना व नेत्यांच्या कुटुंबावर बोलतात. काँग्रेसनं व नेहरू, गांधी कुटुंबानं देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे. हे पंतप्रधानांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना गांधी कुटुंबाबद्दल बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. चिपळूण येथील जाहीर सभेत ते बोलत होते.