sharad pawar video : छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादावर भाष्य केलं. राज्य सरकारनं दोन्ही बाजूच्या लोकांशी वेगवेगळा संवाद साधण्यापेक्षा त्यांना एकत्र बोलावून चर्चा करायला हवी. आम्हीही त्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, असं शरद पवार म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठ्यांबरोबर धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचीही भूमिका मांडली आहे. ती योग्य आहे. त्यातून सध्याची कटुता कमी होण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.