Sharad Pawar attacks Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या दोन गटांनी मुंबईत आज स्वतंत्र मेळावे घेऊन आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या मेळाव्यात काही नेत्यांनी आपला निर्णयाचं समर्थन करताना काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खणखणीत आणि स्पष्ट उत्तर दिलं. शरद पवार हेच आमचे नेते असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांनाही शरद पवार यांनी टोला हाणला. अडचणीच्या काळातही आमचा पक्ष छगन भुजबळ यांच्या मागे उभा राहिला, असं पवार म्हणाले.