Sharad Pawar Blames Narendra Modi : घाटकोपर पश्चिम इथं झालेल्या पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यात शरद पवार यांनी तरुणांना संबोधित केलं. महाराष्ट्रातील व देशातील सध्याच्या स्थितीवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडू कसा शकतो असा सवाल त्यांनी केला. गेटवे ऑफ इंडियावर असलेला शिवछत्रपतींचा १९६० साली उभारलेला आहे, तो आजही दिमाखात उभा आहे. पण मालवणचा पुतळा काही महिन्यांत पडला. या पुतळ्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांचा हात जिथं लागतो, तिथं उलटंसुलटं होतं. मालवणच्या पुतळ्यालाही त्यांचा हात लागला होता, तिथं जे काही व्हायचं ते झालं, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.