Uttamrao Jankar on Hasan Mushrif : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. यावेळी उत्तमराव जानकर यांचं भाषण झालं. जानकर यांनी यावेळी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. कोल्हापूरच्या परिवर्तनाच्या भूमीत गेल्या दहा वर्षांपासून अन्याय सुरू होता. वणवा पेटलेला होता. जंगलाला आग लागली होती. जंगल पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे पळाले. चित्ता पळाला, त्यामागे इथला गेंडाही पळाला, असा बोचरा टोला जानकर यांनी हाणला.