bhushi dam waterfall video : पुण्यातील सय्यद नगर येथील अन्सारी कुटुंबीय रविवारी घरातील लग्नकार्य आटोपून लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. धरणाच्या पाठीमागे असलेल्या एका डोंगरातील धबधब्यात जाणं या कुटुंबीयांच्या जिवावर बेतलं. धबधब्याच्या पाण्यात पाच जण वाहून गेले असून यातील चौघांचे मृतदेह सापडले आहे. तर, एकजण बेपत्ता आहे. लोणावळा येथील शिवदुर्ग पथक, वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मंडळातर्फे शोधकार्य सुरू आहेत.