Satara: साताऱ्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मोती चौकातील छत्रपती प्रतापसिंह मंडळाची दुर्गा देवी व सदर बाजारची भारत माता या दोन देवींची ऐतिहासिक भेट पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय सातारच्या मुख्य रस्त्यावर एकवटला होता. दरवर्षी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान होणारी ही ऐतिहासिक भेट यंदा अभूतपूर्व गर्दीमुळं लांबली व पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. भेट पाहण्यासाठी ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांचा चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरला आणि तीन महिला बेशुद्ध पडल्या.