Sambhajiraje Bhosale Beed Speech Video : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळं राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराड हा १९ दिवसांपासून फरार आहे. त्याला अटक करून फाशी द्या आणि त्याचे आश्रयदाते असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी संबोधित केलं. संभाजीराजे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. वाल्मिक कराडचे आश्रयदाते धनंजय मुंडे आहेत. त्यांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यास मी स्वत: बीडचं पालकत्व घेणार, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.