Samarjeetsinh Ghatge Speech Video : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. यावेळी गैबी चौकात झालेल्या जाहीर सभेत समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार भाषण केलं. २०१९ मध्ये अपक्ष उभं राहावं लागलं. आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. पुढचे दोन महिने आपल्याला खूप परिश्रम करायचे आहेत. कोल्हापूरची पुरोगामी प्रतिमा टिकवायची आहे, असं आवाहन समरजित घाटगे यांनी केलं.