Sachin Tendulkar Viral Video from Kashmir : चाहत्यांनी 'क्रिकेटचा देव' अशी उपमा दिलेला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरचा निसर्ग एन्जॉय करतो आहे. काश्मीरच्या निसर्गाचा आनंद घेत असतानाच वाटेत एके ठिकाणी चाललेला क्रिकेटचा खेळ पाहून सचिन थांबला. कारमधून उतरून तो तरुणांच्या खेळात सहभागी झाला. त्यानं तिथं फलंदाजीही केली. सचिन साधेपणा पाहून सगळेच हरखून गेले होते. खेळून झाल्यानंतर सचिननं सर्वांसोबत सेल्फी देखील काढला. 'क्रिकेट इन हेवन' असं म्हणत सचिननं स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.