Mohan bhagwat : ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही बीभत्स दाखवलं जातं, त्याच्याबद्दल सांगणंही अभद्रपणाचं आहे,’ अशी सांगतानाच, ‘या सगळ्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परंपरागत विजयादशमी मेळावा नागपूरमध्ये पार पडला. या मेळाव्याला मोहन भागवत यांनी संबोधित केलं. राजकीय, सामाजिक बाबींचा उहापोह करताना भागवत यांनी यावेळी माध्यमांमधील कंटेंटवरही भाष्य केलं.