महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज मतदान सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्याची बोटावरील खूणही त्यांनी दाखवली. 'लोकशाहीत मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकानं हे कर्तव्य बजावलं पाहिजे. मी उत्तरांचलमध्ये होतो, पण मी काल रात्री इथे आलो आणि मतदान केलं. प्रत्येकानं मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं.