Maharashtra Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. सिनेमा, उद्योग, क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींनी अत्यंत उत्साहानं मतदान केलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आपले दोन मुलगे व सुनेसह मतदानाला आले होते. मतदानानंतर त्यांनी मतदान केल्याची खूणही दाखवली.