Shaktikanta Das visits Lalbaugcha Raja : महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात सुरू आहे. प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरही यात मागे नाहीत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी राजाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.