Raj Thackeray on Vidhan Sabha Election Results : मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईत पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी ईव्हीएमवरही संशय व्यक्त केला. निकाल लागल्यावर मिरवणुका निघतात, जल्लोष होतो. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं की निकाल लागल्यानंतर जल्लोष झाला नाही. कारण, निकाल असा कसा लागला हे कोणालाच कळलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.