'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे हे उदाहरण आपल्याकडं आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? सध्या ५० टक्क्यांची मर्यादा आहे. जाऊद्या ते ७५ टक्क्यांपर्यंत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. तसं झालं तर ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांचा विचार होईल आणि इतरांचंही समाधान होईल. कुठलाही वाद राहणार नाही. केंद्र सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा. संसदेत दुरुस्ती विधेयक आणावं. आमचे जे कोणी सदस्य असतील ते केंद्र सरकारला पाठिंबा देतील, असं शरद पवार म्हणाले.