मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : अदानींच्या घोटाळ्यावर मोदी गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

Video : अदानींच्या घोटाळ्यावर मोदी गप्प का?; राहुल गांधी यांचा सवाल

Sep 01, 2023 06:00 PM IST Ganesh Pandurang Kadam
Sep 01, 2023 06:00 PM IST

Rahul Gandhi Video : ओसीसीआरपी या संस्थेनं अदानी समूहावर केलेल्या आरोपामुळं उद्योग जगतासह राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जगातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी अदानीवर आरोप करताना पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय असा उल्लेख केला आहे, असं राहुल म्हणाले. राहुल यांनी या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बेनामी कंपन्यांतून अदानी समूहात गुंतवला जाणारा पैसा कोणाचा आहे? अदानी समूहाचे शेअर कृत्रिमरित्या फुगवण्यामागे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्यासह नासिर अली शबान अली व चँग चूँग लींग हा चिनी व्यक्ती आहे. अदानी समूहात एका चिनी व्यक्तीचा रोल काय आहे आणि अदानी समूहाची चौकशी करणारा सेबीचा अध्यक्ष एनडीटीव्ही चॅनेलच्या संचालक पदी कसा, असे थेट प्रश्न राहुल यांनी केले आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp