Rahul Gandhi Kolhapur Speech Video : कोल्हापूरमधील कसबा बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी जमलेल्या विशाल जनसमुदायाला राहुल गांधी यांनी संबोधित केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का पडला याचं कारणही राहुल गांधी यांनी सांगितलं. बनविणाऱ्यांची नियत चांगली नसल्यामुळंच महाराजांचा पुतळा पडला. पुतळा पडण्यामागे एक संदेश होता. तुमची विचारधारा चुकीची आहे, हा संदेश शिवाजी महाराजांनी त्या लोकांना दिला, असं ठाम मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.