Prithviraj Chavan on Sambhaji Bhide : वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'चे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी काल अमरावतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केलं. गांधीजींचे वडील मुस्लिम होते. गांधीजींच्या आईला पळवून नेण्यात आलं होतं, असं भिडे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत संभाजी भिडे यांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या अटकेची मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अशी भाषा करणारा व समाजात तेढ निर्माण करणारा हा भिडे बाहेर कसा फिरू शकतो, असा सवाल त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी चव्हाण यांच्या मुद्द्याची दखल घेत राज्य सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.