PM Modi at Manmohan Singh Home : प्रख्यात अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी निधन झालं. मनमोहन सिंह हे तब्बल ३३ वर्षे संसदेचे सदस्य होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या आणि भारताला जगाची कवाडे खुली करून देणाऱ्या मितभाषी मनमोहन यांना जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिल्लीतील निवासस्थानी जाऊन मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन केलं व कुटुंबीयांचं सांत्वन केलं.