Pankaja Munde Speech : बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यावेळी उपस्थित नेत्यांची भाषणं झाली. पंकजा मुंडे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांकडून 'बाहुबली' असा उल्लेख होत असल्याचं पाहून पंकजा मुंडे यांनीही मला लोक 'शिवगामिनी' म्हणायचे, याची आठवण दिली. शिवगामी आणि बाहुबलीचं नातं आईचं आहे असं त्या म्हणाल्या. शिवगामी प्रमाणेच मेरा वचनही शासन है... असं त्या म्हणाल्या.