Pankaja Munde on Joining congress : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मुंबईत वरळी इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याबद्दल होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चेवर भूमिका मांडली. काँग्रेस प्रवेशाचं वृत्त त्यांनी यावेळी स्पष्टपणे खोडून काढलं. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना प्रत्यक्ष मी कधी पाहिलेलंही नाही. त्यामुळं भेट घेण्याचा प्रश्नच नाही. असं असूनही मी त्यांना भेटल्याची बातमी देणाऱ्या चॅनेलविरोधात मी दावा ठोकणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.