Nagpur Winter Session Video : हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरल्याचं पहायला मिळालं. नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री... शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान... दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर... गद्दार सत्तार राजीनामा द्या, राजीनामा द्या... अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा... संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे... आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली.