Protest Outside Sansad Bhavan : अदानी उद्योगसमूहावर सातत्यानं होणाऱ्या आरोपांची चौकशी केली जावी व त्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. अमेरिकेच्या न्यायालयानं अदानींवर घोटाळ्याचा ठपका ठेवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत. जेपीसी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. मात्र चौकशी सोडाच, सरकार साधी चर्चाही करायला तयार नाही. याचा निषेध म्हणून विरोधकांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. देश विकू देणार नाही असे फलक झळकावले. मोदी सरकार हाय-हायच्या घोषणाही दिल्या.