Vijay Wadettiwar Video : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत पडल्यानं महाराष्ट्रात व शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींसह विरोधकांनीही राज्यातील महायुती सरकारला घेरलं आहे. टक्केवारी आणि दलाली खाण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही हा महाराष्ट्राचा आणि शिवप्रेमींचा घोर अपमान आहे, अशी घणाघाती टीका राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.