Maharashtra Assembly Session Video : महाराष्ट्र विधानसभेत नव्यानं निवडून आलेल्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार घातल्यानं केवळ सत्ताधारी आमदारांचा शपथविधी झाला. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले अबू आझमी यांनीही आज शपथ घेतली. सना मलिक यांनी मराठीत, तर नीतेश राणे यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.