Mahayuti Govt Oath Taking Ceremony : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमतासह सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे देखील यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडवणवीस यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.