Devendra Fadnavis On Valmik Karad : 'बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांचीही कुचराई दिसत असल्याचं सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. तसंच, देशमुख यांच्या हत्येत दोषी आढळल्यास वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी नेमकं काय घडलं हेही फडणवीस यांनी सविस्तर सांगितलं.