Devendra Fadnavis on Beed Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर फरार असलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण आला. त्यानंतरही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 'संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीला स्वायत्तता दिलेली आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. ज्याच्याविरोधात पुरावा असेल, त्या प्रत्येकावर अतिशय कडक कारवाई होणार, असं फडणवीस यांनी सांगितलं.