sharad pawar on cm face : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरही त्यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच जाहीर करण्याच्या आग्रहाला अर्थ नाही. राज्यात आणि देशात स्थिर पर्याय देणं याला आमचं प्राधान्य आहे. आणीबाणीच्या काळातही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झालेला नव्हता. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यामुळं आताही तशी काही आवश्यकता नाही, असं पवार म्हणाले.