Maharashtra Assembly Election : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बदलापूरमध्ये सभा झाली. बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर देशात बदनामी केली आहे. ही बदनामी नव्या आमदारांनी आणि खासदारांनी पुसून टाकावी, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.