Supriya Sule Video : राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं. निवडणूक निकालावर त्यांनी देखील संशय उपस्थित केला. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी अशी आमची मागणी आहे. जगभरात मतपत्रिकेवर मतदान होतं. ईव्हीएमवर मतदान घेणारे देशही मतपत्रिकेवर घेऊ लागले आहेत, याकडं सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं. परीक्षेचा पेपर लीक झाला की परीक्षा रद्द केली जाते, मग निवडणूक पुन्हा घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला.