Supriya Sule Speech Video : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे. नाती ही प्रेमानं आणि विश्वासानं जपली जातात. पैशानं फक्त व्यवहार होतो. राज्यातल्या सरकारला वाटतंय नाती अशीच चालतात. १५०० रुपये दिले की नवीन बहीण. हा नात्याचा अपमान आहे. कुठलीही बहीण पैशानं जोडली जात नाही. प्रेमानं आणि विश्वासानं जोडली जाते, असं सुप्रिया सुळे यांनी सुनावलं.