Amol Kolhe attacks Mahayuti govt : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली. त्या निमित्तानं जुन्नरमध्ये शुभारंभाचा मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे यांनी तडाखेबंद भाषण केलं. राज्यातील इतके प्रकल्प गुजरातमध्ये गेले, पण एकही नेता केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकला नाही. आता निवडणूक आली की योजना आणतायत. ह्या सगळ्या योजना फसव्या आहेत. 'लाडकी खुर्ची' ही ह्यांची एकच खरी योजना आहे, अशी घणाघाती टीका अमोल कोल्हे यांनी केली.