Jitendra Awhad On Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळं राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराड हा १९ दिवसांपासून फरार आहे. त्याला अटक करून फाशी द्या आणि त्याचे आश्रयदाते असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संबोधित केलं. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संतोष देशमुख प्रकरणातला 'आका' कोण आहे हे सोडा. त्याचा बाप कोण आहे ते बघा. तो कोण आहे सर्वांना माहीत आहे. त्याला पहिला मंत्रिमंडळातून हाकला, असं आवाहन आव्हाड यांनी केलं.