video : हा कोण नवीन मनु आला… देशाच्या स्वातंत्र्याला दळभद्री म्हणणाऱ्या संभाजी भिडेंवर जितेंद्र आव्हाड बरसले!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : हा कोण नवीन मनु आला… देशाच्या स्वातंत्र्याला दळभद्री म्हणणाऱ्या संभाजी भिडेंवर जितेंद्र आव्हाड बरसले!

video : हा कोण नवीन मनु आला… देशाच्या स्वातंत्र्याला दळभद्री म्हणणाऱ्या संभाजी भिडेंवर जितेंद्र आव्हाड बरसले!

Jul 12, 2024 05:55 PM IST

Jitendra awhad slams sambhaji Bhide : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल, महाराष्ट्रातील समाजसुधारकांबद्दल व महिलांच्या पेहरावाबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड विधानसभेत चांगलेच बरसले. संभाजी भिडे हे वारंवार महापुरुषांचा अपमान करतात... वर्णवर्चस्ववादी भूमिका मांडतात... महिलांना नको ते उपदेश देतात... देशाच्या स्वातंत्र्याला दळभद्री म्हणतात... असं असतानाही ते मोकाट कसे? राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आज केला. सरकारच्या मनात मनुबद्दल प्रेम असल्यामुळंच भिडेसारख्या किड्यांवर कारवाई होत नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp